आठवण
Episode 1 Recap:
पण समोरचा दृश्य पाहून आत्तापर्यंत धूसर वाटणाऱ्या आठवणी तिला स्पष्ट आठवू लागल्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाली. "तू...?"
गुरगुरत्या स्वरात कुत्स्तितपणे तो उत्तरला. ''हो.....मीच!!!! तू विसरली असशील मला पण मी कसा विसरेल ग तुला.......?"
Read Episode 1: Click Here... आठवण भाग: १
आठवण भाग: २
अनघा क्षणभरासाठी थबकली. कालचक्र क्षणभरासाठी थांबले आहे असे तिला वाटले. अमेयला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोंडातून आवाज निघेना. डोक्यात आठवणींचे पडसात उमटत होते. ज्या आठवणी तिला खूप वर्षांनपासून धूसर वाटत होत्या, त्याच आज भयानक सावल्यांचा रूप घेऊन थैमान घालत आहे, असा तिला आभास झाला.
"सुहासदादा तू...?''
Marathi horror stories
जवळजवळ दहा वर्षांनंतर ती त्याला बघत होती.त्याचे ते आक्राळविक्राळ रूप, निर्जीव देह, डोळ्यानेच जरब बसेल अस भेदक बघणं तिला गर्भगळीत करत होते.
''दादा...? अग मी फक्त तुझा सुहास आहे!" त्याचा ते ओंगळवाणं रूप आणि किळसवाण हसू ऐकून अनघाच्या अंगावर काटा आला.
''पण तुला तर वसंत तात्यांनी...'' आणि तिचे शब्द गोठले.
''हो... त्या थेरड्याने माझा जीव घेतला... ते पण तुझा डोळ्यासमोर...! आणि तू? दहा वर्ष मी तुझी वाट बघत आहे. माझ्या या परिस्थितीला तूच कारणीभूत आहेस. तो थेरडा आणि तू पळून गेले. माझा आत्मा इथे तडफडत सोडून... आता मी नाही सोडणार तुला..."
सुहासच्या त्या भयानक, काळ्याकभीन्न आकृतीने अनघावर झेप घेतली. त्याचं ते विचकट हसू आणि वासनेने भरलेले डोळे तिचा भीतीने थरकाप उडवत होते.
तिचं शरीर थंड पडलं. सुहासचा तो ओंगळवाणा स्पर्श तिला "त्या" घटनेची आठवण करून देऊ लागला... आणि तिला भोवळ आली.
''अनघा... अगं उठ ना... अनघा... सकाळचे नऊ वाजले आहेत, आई बाबा भेटायला येणार आहेत, अनघा...'' अमेय जवळजवळ किंचाळतच बोलत होता.
Marathi horror stories read online
Horror stories in Marathi for reading
Marathi horror stories blogs
किलकिल्या डोळ्याने अनघा अमेयला म्हणाली, "अमेय, मला आपण गावी गेल्यानंतर काय काय केल ते अजूनही आठवत नाहीये. फक्त आपण तिथे पोहोचल्यानंतर सुहासदादाने माझ्यावर केलेला हल्ला एवढंच आठवत आहे."
"कोण सुहासदादा? अग हा प्रश्न मी तुला अनेकदा विचारला आहे. तो सुहासदादा कोण आहे हे तुलातरी आठवत का? आज आई बाबा येणार आहेत. तू त्यांना एकदा विचारून बघ. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे तर मी निघतो. आय लव्ह यू बच्चा... बाय .''
दरवाजा जोरात आदळल्याचा आवाज आला. अंगात त्राण नसलेली अनघा कसबस उसण अवसान आणून उभी राहिली.
''आई तू तरी मला समजून घे. मला सुहासदादाने माझ्यावर हल्ला करणं, आणि तो ओंगळवाणा स्पर्श एवढंच आठवत आहे.तो किळस आणणारा स्पर्श, माझ्यामनातली घृणा आणि माझी शुद्ध हरपणा एवढंच मला आठवत आहे गं, आणि हि गोष्ट माझ्या डोक्याचा भुगा करत आहे.''
"अगं बाळा, एखादं स्वप्न असेल." सुधाकरराव चाचरत म्हणाले.
''बाबा... तुम्हाला समजत कस नाहीये... स्वप्न असतं तर गोष्ट एका दिवसाची असते, पण मला जवळजवळ एक महिनाभर माझ्यासोबत गावी काय झाला याची काहीच कल्पना नाहीये. मला फक्त ती रात्र आठवते आणि अचानक एके सकाळी मला मी इथे जागी झाली आहे एवढंच आठवत आहे.''
''अगं पण अनघा, अमेयने तुझे आणि त्याचे सोबतचे फोटो आम्हाला दाखवले. तुझी तब्बेत ठीक नव्हती म्हणून तू प्रोजेक्ट वर काम केलं नाहीस असं मला कॉल वर बोलली होतीस. अनघाची आई तळमळीने बोलली.''
तुम्हाला काय वाटतंय मी खोट बोलत आहे का? मला असं का वाटतंय की तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवत आहात?
अनघाची ती भेदक नजर लक्ष्मीबाईंना वर्मी घाव बसल्यासारखी बोचली. त्याचा नजरेतला चोरटेपणा अनघाने चपळाईने हेरला.
Marathi horror stories read online
Horror stories in Marathi for reading
Marathi horror stories blogs
"आई... मी वेडी होईल...! प्रत्येक रात्री तो किळसवाणा स्पर्श मला एका अनामिक भीतीची जाणीव करून देत आहे. माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले आहे. कधी कधी असं वाटतात कि जीव देऊन या विचारांच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी." अनघा हमसाहमशी रडू लागली.
लक्ष्मीबाईंनी एकदा सुधाकररावाकडे लाचारीने पाहिले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून त्यांची सहनशक्ती संपली. कोरड्या केसांचा झापं, डोळयाखाली काळे वर्तुळे असलेली निस्तेज अनघा त्यांना भेडसावून सोडू लागली.
त्यांनी अनघाला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, "मला माफ कर बाळा, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. तुझा लहानपणीची एक घटना आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवली. मला वाटलं, देवाने तुला वाचवलं! पण भूतकाळाचा सावल्या तुझा असा पाठलाग करतील असा मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं."
पाणावलेल्या डोळ्याने अनघा एकवार सुधाकर रावांकडे तर एकदा लक्ष्मीबाईंकडे बघायला लागली. आपल्या भूतकाळाच्या कथेची पुस्तकाची पाने ती नव्याने वाचणार होती.
''तू चौदा वर्षाची होतीस. उन्हाळ्याची सुट्टी होती होती त्यामुळे आपण मामाच्या गावी गेलो होतो. गावी आज्जी, बाबा, मामा होते त्यामुळे तू चांगलं रमली होतीस. बाबांना काम होतं त्यामुळे आपण लवकर निघणार होतो परंतु तू हट्टाने तिथे राहिलीस.''
"आणि मग...?"
"तू ज्या सुहासदादा चा उल्लेख केलास ना त्या नराधमाने तुझा आयुष्याची राखरांगोळी केली..." आणि लक्ष्मीबाई हमसाहमशी रडू लागल्या.
"सुहास तुझा मामाचा मित्र होता. तो गावी जुन्या घरी मामासोबत येत असे तेव्हा त्याने तुला पहिल्यांदा पाहिले. तू नेहमी त्याला दादा बोलत असे पण तो राक्षस मनात काही सैतानी विचार घेऊनच तुझा भोवती वावरत होता."
"एके दिवशी आजी बाबा रानात काम करायला गेले होते. वाड्यात तू, अशोकमामा आणि वसंत तात्या होते." सुधाकर राव शून्यात नजर खिळून बोलले.
"अशोक मामा आज्जी बाबांसाठी डब्बा घेऊन दुपारी रानात रवाना झाला. जेव्हा ते संध्याकाळी घरी आले, तेव्हा ते तिघे हादरून गेले. रक्ताच्या थारोळ्यात तू पडली होतीस. अंगावर एकही वस्र नसलेली माझी चिमुरडी मरणासन्न अवस्थेत पडली होती."
"दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आणि आईने तुला जेव्हा पहिल, तेव्हा माझा काळजाचा ठोका चुकला. माझं हृदय अक्षरशः पिळवटून निघालं होतं. ज्या चिमुरडीला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, तिला त्या नराधमाने कुस्करून टाकलं होतं.'' नकळत गालावर आलेले अश्रू सुधाकर रावांनी पुसले आणि आवंढा गिळला.
"वसंत तात्यांनी पोलिसांना सांगितलं कि जेव्हा ते बाजारातून परत आले तेव्हा त्यांनी सुहास ला अनघा सोबत दुष्कर्म करताना पहिला. त्यांना पाहून त्याने पळ काढला. त्यांनी त्याचा पाठलाग केला पण त्याने पोबारा केला.
"या घटनेचा चार दिवसानंतर तुला शुद्ध आली. आणि तू आम्हाला चक्रावून सोडलसं. या घटनेचा एकही तपशील तुला लक्षात नव्हता. जणूकाही कुणी तुझी त्या घटनेबद्दलची स्मृती पुसून टाकली होती. या गोष्टीवर आम्ही हसावं कि रडावं हेच समजेना. तुला फक्त एवढंच आठवत होता कि तू सुट्टीसाठी गावी आली होतीस, माजघरात बसली होतीस, आणि यानंतरच काहीच नाही....!" लक्ष्मीबाई उत्तरल्या.
"आई मला हे सगळं काहीच आठवत नाहीये आठवत आहे तो फक्त घाणेरडा स्पर्श! माझा आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत." अनघाने हंबरडा फोडला. ती ओक्साबोक्शी रडू लागली.
"त्यानंतर आम्ही पोलीस चौकशी तिथेच थांबवली. सुहास आम्हाला काही सापडला नाही. मग आम्ही तुला मुंबई ला घेऊन आलो. इथे आल्यावर तू शून्यातं हरवलेली असायची. खुप साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुला देखील मिळत नव्हती. माझा बागडणारं फुलपाखरू हरवलं होता. मग आम्ही तुला डॉक्टर जोशींकडे घेऊन गेलो."
"त्या प्रसंगाचा आठवणी नक्की कुठे गेल्या, याचा छडा आम्हाला लावायचा होता. डॉक्टर जोशी हे नावाजलेले सायकियाट्रिस्ट होते. तुझा केस स्टडी करून त्यांचा असा निष्कर्ष होता, कि ती घटना तुझ्यासाठी एक आघात होती. एक मानसिक हल्ला! त्या ट्रोमॅटिक इव्हेंट मुळे dissociative amnesia या सायकॉलॉजिकल डिसऑर्डर ची शिकार झालीस."
"Dissociative amnesia...?" अनघा पूर्णपणे अनभिज्ञ होती.
सूर्यास्त होऊन खुप वेळ झाला होता. घरातील दिवे लावले नसल्याने पूर्ण घर काळोखात बुडून गेला होत. घरात तिघेही अंधारात बसले होते. मनावरचं जर दुःखाचं मळभ असेल, तर नजरेला अंधकाराचा सामना करावा लागला तरी काय हरकत असणार म्हणा...?
1 टिप्पणी(ण्या):
Click here for टिप्पणी(ण्या)superb
ConversionConversion EmoticonEmoticon