आठवण
Episode 3 Recap:
ब्रम्ह्यमुहूर्तानंतर सूर्यनारायणाचे आगमन झाले होते. सूर्याच्या नव्या किरणांसोबत तिचा मनात आशेचा किरण देखील डोकावला. आणि निर्धाराने ती अमेयचा डोळ्यात डोळे घालून बोलली, "आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेतं. या घटनेची सुरुवात माझ्या आजोळी झाली त्यामुळे त्याचा शेवट पण तिथेच होणारं. माझा आठवणींची अक्षर धूसर झाली आहेत. त्यामुळें मलाच लेखणी घेऊन ती अक्षर ठळक करायची आहेत."
"मला असं वाटतंय त्यातूनचं आपल्याला या अमानवी शक्तीचा सुगावा लागेल. कारण बरेचदा भविष्यकाळचं हा भूतकाळाचा आरसा असतो."
लक्ख प्रकाशाने घर उजळून निघाले होतं. कोण जाणे अनघाच्या आठवणी देखील त्यामुळे प्रखर होतील!
Read Episode 1 : आठवण भाग : १
Read Episode 2: आठवण भाग : २
Read Episode 3: आठवण भाग : ३
आठवण भाग: ४
अनघा बाल्कनीमद्धे मक्खपणे बसली होती. अमेय नुकताच झोपेतून उठला होता. रात्रभर जागरण झाल्यामुळे तो पूर्णपणे थकला होता. त्याला जागं झालेला बघून अनघा किचनमद्धे रवाना झाली. गरम-गरम चहाचा वाफाळता कप घेऊन ती अमेय कडे आली.
"हे काम मात्र तू चांगलं केलंस अनघा! या रात्रीचा तो प्रसंग म्हणजे कहरच होता. तुला एक सांगू माझा आजपर्यंत भूत-प्रेत आत्मा यांचावर थोडापण विश्वास नव्हता. पण काल!!!" आणि त्याने खिडकीतून बाहेर बघत चहाचा एक घोट घेतला.
"अमेय आपण गावी जाऊयात." अनघा पुटपुटली.
"हो... मी पण तोच विचार करत होतो. पण त्या आधी आपण डॉक्टर जोशींना भेटून येऊयात. मी कालच त्यांना मेल करून ठेवला आहे. सुदैवाने आता ते पुण्यात नसून मुंबईमद्धेच आहेत. गावी जायचा आधी आपण त्यांना एकदा भेटून घेऊ."
"हो... हे एक बर केलंस. कारण बाहेरचा शक्तीबद्दल लढायचं आधी मला स्वतःला समजून घेयला हवं." इति अनघा.
* * *
"मुंबईमद्धे इतकी शांत जागा मिळणं अशक्य आहे अनघा... कसला बंगला आहे..!" अमेय गाडी पार्क करताना बडबडत होता. अनघाने कारच्या खिडकीतून बाहेर डोकावले.
गर्द झाडांमद्धे तो टुमदार बंगला म्हणजे एक आगळंवेगळं दृश्यच होत. डॉक्टर जोशी... अनघा बंगल्यावरची पाटी वाचू लागली. बंगल्याचे फाटक उघडून दोघांनी बंगल्यात प्रवेश केला.
बगीच्यामद्धे त्यांना एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली दिसली. त्यांना बघून त्यांनी स्मितहास्य केलं. अमेयने हात हलवून त्यांना आवाज दिला.
"डॉक्टर जोशी...?" त्यांनी मान हलवली आणि अनघा आणि अमेयला त्यांनी तिकडेचं बोलावले.
Marathi Horror Stories
Marathi Horror Stories Read Online
Horror Stories in Marathi for Reading
"तुमचे कसे आभार मानावे तेच कळतं नाहीये. मी रात्री मेलमद्धे तुम्हाला सगळी माहिती सांगितली. मला नव्हता वाटलं कि तुम्ही एवढ्या तातडीने त्याला उत्तर देताल. मी तुमचा खरच खुप आभारी आहे." अमेय उत्तरला.
"मी अनघा..." अनघाने स्वतःची ओळख करून दिली.
"नमस्कार, आपली भेट पहिल्यांदा झाली आहे. अमेयने मला सध्याचा परिस्थितीचा आढावा दिला आहे. तरीही मला एकदा तुझ्याकडून पूर्ण घटना ऐकायला आवडेल.
अनघाने लग्नानंतर प्रोजेक्टसाठी गेलेल्या क्षणापासून ते आदल्या रात्रींपर्यंतचा संपूर्ण वृत्तांत कथन केला. घडलेल्या घटना ऐकताना डॉक्टर जोशींचा चेहऱ्यावरचे हावभाव क्षणाक्षणाला बदलत होते.
संपूर्ण घटना ऐकल्यानंतर अनघाने एक दीर्घ श्वास घेतला. डॉक्टरांनी पुढे केलेला पाण्याचा पेला तिने एका दमात संपवला. दोन मिनिटांसाठी तिघेही शांत होते. वाऱ्याची थंड झुळूक हळुवारपणे वातावरणातील ताण कमी करत होती.
"हुश्श..." कपाळावरील घाम पुसत डॉक्टर जोशी बोलू लागले." हे प्रकरण आता फक्त dissociative amnesia चे उरले नाहीये. माझा उभ्या आयुष्यात माझा अमानवी गोष्टींवर विश्वास नव्हता. परंतु आयुष्यात कधी कधी अशा काही घटना घडतात आणि आपल्याला त्या शक्तींचा अंदाज येतो." क्षणभरासाठी डॉक्टर भूतकाळात हरवले.
"डॉक्टर तुम्ही ठीक आहात ना...?" अमेय काळजीपोटी पुटपुटला.
"अ... हो... तर आपण कुठे होतो? हो आठवलं, मला वाटतंय आपण अनघाला hypnotherapy देऊयात. तिचा मनाचा थांगपत्ता आपल्याला माहित नाही. तिने ज्या घटनेचा सामना केला त्याची एकमेव साक्षीदार फक्त ती आहे. आठवणींचे हे पुसट धागे एकमेकांना जोडून आपल्याला निसटलेल्या क्षणांची वीण घट्ट करायची आहे."
"राहता राहिला प्रश्न त्या अमानवी शक्तीचा तर एकदा आपली स्पर्धा कुणासोबत आहे हे कळलं कि त्याचा सामना करण सोप्पं जाईल. मनावरील मळभ एकदा साफ झालं, कि सगळं स्पष्ट होईल."
डॉक्टरांचा शब्दाने अनघा आणि अमेयला धीर आला. ते दोघेही त्यांचा मागोमाग जाऊ लागले.
* * *
"हो हो... मी hypnotherapy ला सुरुवात करत आहे. तुझा काम आटोपलं कि लगोलग ये. चल बाय...!" डॉक्टरांनी फोनवरचं बोलणं थांबवलं.
अनघा ,अमेय आणि डॉक्टर डॉक्टरांचा स्टडीरूम मद्धे बसले होते. एका आराम खुर्चीवर अनघा बसली होती. त्या रूममद्धे दोन-तीन खिडक्या असल्यामुळे हवा चांगलीच खेळती होती. त्यामुळे उन्हाचा वाढता कहर तेवढा काही परिणाम दाखवतं नव्हता.
एक खुर्ची अनघाचा पुढ्यात ओढून डॉक्टर त्यावर बसले. अनघाला त्यांनी हळुवार डोळे मिटायला लावले.
Marathi Horror Stories
Marathi Horror Stories Read Online
Horror Stories in Marathi for Reading
"अनघा, मी जे सांगतोय त्या शब्दांना काळजीपूर्वक एक. तुझं सगळं चित्त एका जागी आण आणि मी जसं सांगेल तसं तू इमॅजिन कर."
हळूहळू डॉक्टर तिला खुपसारे प्रश्न विचारू लागले. त्यामद्धे ती त्यांना प्रतिसाद देत होती. हळूहळू डॉक्टरांना जाणवलं कि ती trans-phase मध्ये गेली आहे. आणि त्यांनी मुद्द्याला हात घातला.
क्षणाक्षणाला वातावरणातील ताण वाढत चालला होता. परंतु डॉक्टर एकदम शांत होते. अमेयचा मनाची घालमेल वाढतं चालली होती.
डॉक्टरांनी अनघाला पुढचा प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"अनघा... तुला आठवत, जवळजवळ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तू उन्हाळ्याचा सुट्टीत तुझा आजोळी आई -बाबांसोबत गेली होतीस. गावी आज्जी, बाबा, मामा होते. तू तिथे चांगली रमली होतीस. आणि गावावरून परत मुंबईला येण्याअगोदर तुझ्यासोबत एक घटना घडली. त्या दिवशी तू माजघरात एकटी होतीस. आज्जी-बाबा मामा रानात गेले होते. तू एक पुस्तक वाचत होतीस. त्या घटनेचा तपशील डॉक्टरांचा आजही डोक्यात चांगल्या प्रकारे मुरला होता.
"ययाती... ययाती वाचत होते मी. मला आजही आठवत." तिचा ते वाक्य ऐकून डॉक्टर जोशींचे डोळे चमकले. क्षणभरासाठी अमेय देखील चक्रावला.
"मला ते पुस्तक रवीने दिले होते. रवी... वसंततात्यांचा मुलगा! आम्ही ना खुप मज्जा करायचो. माझ्यापेक्षा तीन वर्षांने तो मोठा होता. आंब्याचा मोहोर चांगला फुलाला होता. त्याचा वास मस्त दरवळत होता. कोकिळा देखील मस्त कुहूकुहू ओरडत होती. अचानक मला कुणीतरी धडपडून पडल्याचा आवाज आला. मी हॉल गेले. पण तिथे कुणी नव्हते. मग मी हॉलचा दरवाजा बंद करून पुन्हा वाचायला माजघरामद्धे गेले. तिथे सुहासदादा उभा होता." तिच्या आवाजातला थरकाप पुढचा घटनेच्या दाहकतेचा अंदाज वर्तवत होता.
"सुहासदादाचे ते किळसवाणे हसू पाहून माझा अंगावर शहारा आला. तो हळूहळू माझा जवळ येऊ लागला. मी धावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने माझा हात पकडला आणि माझा डोकं भिंतीवर आदळलं." अनघा हे सांगताना अक्षरशः किंचाळत होती.
Marathi Horror Stories
Marathi Horror Stories Read Online
Horror Stories in Marathi for Reading
"मी खाली पडली असताना तो माझा जवळ येऊन त्याचा घाणेरडा हात माझा अंगावर फिरवू लागला. आणि मी माझा अंगातली सर्व शक्ती पणाला लावून जोरात ओरडू लागले. माझा डोळ्यासमोर पूर्ण अंधाऱ्या येत होत्या. पण मला आठवत. चांगलंच आठवत... कुणीतरी माझे तोंड दाबले. तोंडात कसलातरी कोंदट बोळा कोंबून माझे हात पाय बांधून टाकले. आणि मग सुरु झाल्या नरकयातना..."
तिचा डाव्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली.
"आणि मग...?" हा प्रश्न विचारताना डॉक्टर जोशींचा देखील कंठ दाटून आला होता.
"जाणीव... हरवली... क्षणभरासाठी माझी शुद्ध हरपली. पण माझा तोंडावर पाणी टाकून मला त्या नराधमाने पुन्हा जाग केलं. किलकिल्या डोळ्याने मी इकडे तिकडे बघू लागले... आणि आणि..."
"आणि पुढे..?" डॉक्टरांनी अधीरतेने विचारले.
"रवी... रवी तिथेच होता. त्यानं त्यानं देखील..." आणि ती हालचाल करू लागली. तिला सगळं आठवत होतं. त्या भावना... तो स्पर्श... जणूकाही जुन्या जखमेवरची खपली निघाली होती. आणि भावनांचा तो कल्लोळ रक्तासारखा वाहत होता.
अमेय तिला अशा स्थितीत बघून हादरून गेला होता. एका क्षणासाठी त्याला वाटलं की तिला या गोष्टी आठवत नव्हतं तेव्हाच चांगलं होतं. निदान ती या यातनेपासून मुक्त तर होती. आठवणींचा असा हौदोस पाहून तो हादरून गेला होता. मूकपणे अश्रू ढाळण्यावाचून तो काय करू शकतं होता.
डॉक्टर जोशी तिला शांत करू लागले. "अनघा पुढे काय झाले तुला आठवतं आहे का? त्या क्षणाचे बारीक तपशील तू सांगू शकतेस का? बाळा तुला हे आठवायलाच हवं. तुझ्यासाठी आणि तुला माहिती आहे हे तुझ्या स्वतःसाठी किती महत्वपूर्ण आहे. तुला हि लढाई जिंकायची आहे. स्वतःविरुद्धची आणि त्या अमानवी शक्ती विरुद्धची पण."
अनघा थोडावेळ शांत बसली. आणि ती बारकाईने गोष्टी आठवू लागली.
"त्यानंतर रवी आणि सुहासदादा एकमेकांसोबत बोलू लागले. गावात कुणाला ह्या गोष्टीची कुणकुण लागायला नको कि हे कांड आपण केलं आहे. च्यायला जर तू मला बघितला नसतस तर तुला हिला हात पण लावू दिला नसत. अनघा फक्त माझी आहे. एकदा जर सगळ्या गावाला समजलं कि हिच्यासोबत असं झालंय, तर हिच्यासोबत लग्न करायला कुणी तयार होणार नाही. मग मीच तिच्यासोबत लग्न करेल आणि अनघा कायमची माझी होणार." सुहास सैतानी हास्य करत बोलू लागला.
"असं कसं...?" रवी रागाने बोलू लागला. "ती फक्त माझी आहे."
"त्यानंतर दोघांमद्धे बाचाबाची झाली. रवीने रागात सुहासदादाला जोरात धक्का दिला. आणि तो भिंतीवर धडकला. तो घाव त्याचा वर्मी लागला. आणि त्याचे डोळे एकदम निर्जीव झाले. पण त्याचे डोळे... त्याचे ते डोळे माझ्यावर खिळले होते. ते डोळे... एकदम भेदक! जसं माझा सुगावा घेतं ते कुठेही येणार."
"तेवढ्यात दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. माझा जिवंत जीव आला. घाबरलेल्या रवीने दरवाजा उघडला. वसंततात्यांना पाहून मी धडपड करू लागले. इथल्या परिस्थितीचा अंदाज त्यांनी लावलाच होतां. परंतु माझी सुटका त्यांनी केली नाही."
"मग ते दोघे मिळून सुहासदादाचं शरीर हलवू लागले."
त्या नरकयातना आजही आठवल्या तरी माझा जीव कासावीस होतो. वसंततात्या माझा दिशेने येत होते. त्यांचा हातात कुदळ होती. पुढे काय होणार याची मला पुरेपूर कल्पना आली होती. मी डोळे मिटून घेतले. शारीरिक त्रासापेक्षा हा जो विश्वासघाताचा सामना मी केला होता तो सगळ्यात त्रासदायला होता. आणि माझा शरीरावर सपासप वार झाले."
Marathi Horror Stories
Marathi Horror Stories Read Online
Horror Stories in Marathi for Reading
डॉक्टरांचे देखील डोळे पाणावलेले होते. त्यांनी अनघाला डोळे उघडायला लावले. आसवांनी डबडबलेले डोळे अनघा हळुवारपणे खोलू लागली.
तिने एकवार अमेयकडे बघितलं. इतका वेळ धीर धरून बसलेला अमेय हमसाहमशी रडू लागला. अनघाला प्रत्येक गोष्ट आठवत होती. पण तिचा डोळ्यात दुःखाची जागा एका वेगळ्या करारी भावनेने घेतली होती.
"अमेय रडू नकोस..!" अनघा अगदी कणखरपणे म्हणाली. "आता मला समजलं आहे कि माझा सामना कुणासोबत आहे. आता जर मी खचून गेले तर हा मी स्वतःवर अन्याय केल्यासारखं होईल."
"एकदम बरोबर..." स्टडी रूमचा दरवाजाजवळ एक एकवीस वर्षीय तरुणी उभी होती. डोळयामद्धे एक वेगळीच चमक असलेली ती युवती स्मित हास्य करत अनघाकडे बघत होती.
बुचकळ्यात पडलेले अनघा आणि अमेय एकदा त्या युवतीकडे तर एकदा डॉक्टर जोशींकडे बघू लागले.
"ओह... सॉरी, ओळख करून देण्याचं राहून गेलं. हि माझी मुलगी रेवा..."
"अनघा तुझा आयुष्यातला एक हिस्सा तर आपल्याला कळला आहे. परंतु आपली स्पर्धा आता तुझ्यासोबत नसून एका अमानवी शक्तीसोबत आहे. आणि त्यात रेवा तुझी मदत करेल." डॉक्टरांनी कोडं सोडवलं.
"हाय... आय एम रेवा... आय एम अ पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर..!"
तिचा चेहऱ्यावरचं ते गोडं हसू अनघा आणि अमेयला आशेचा किरण दाखवू लागली. डोक्यातील विचारांचं धुकं दूर सारून अनघा खिडकीतून मावळतीचा सूर्य बघू लागली. मावळतीचा सूर्य आशेची एक नवी ज्योत तिचा मनात पेटवून जात होता. येणाऱ्या अकल्पित गोष्टींची नांदी लागणार याची वार्ता देऊन तो स्वतः परतीच्या मार्गाला लागला होता.
* * *
ConversionConversion EmoticonEmoticon