आठवण
Episode 2 Recap:
"त्या प्रसंगाचा आठवणी नक्की कुठे गेल्या, याचा छडा आम्हाला लावायचा होता. डॉक्टर जोशी हे नावाजलेले सायकियाट्रिस्ट होते. तुझा केस स्टडी करून त्यांचा असा निष्कर्ष होता, कि ती घटना तुझ्यासाठी एक आघात होती. एक मानसिक हल्ला! त्या ट्रोमॅटिक इव्हेंट मुळे dissociative amnesia या सायकॉलॉजिकल डिसऑर्डर ची शिकार झालीस."
"Dissociative amnesia...?" अनघा पूर्णपणे अनभिज्ञ होती.
सूर्यास्त होऊन खुप वेळ झाला होता. घरातील दिवे लावले नसल्याने पूर्ण घर काळोखात बुडून गेला होत. घरात तिघेही अंधारात बसले होते. मनावरचं जर दुःखाचं मळभ असेल, तर नजरेला अंधकाराचा सामना करावा लागला तरी काय हरकत असणार म्हणा...?
Read Episode 1 : आठवण भाग : १
Read Episode 2: आठवण भाग : २
आठवण भाग: ३
अमेयचा मिठीमद्धे अनघा हमसाहमशी रडू लागली. अनघाला अशा अवस्थेत बघून अमेय हादरून गेला. तिला कस सावरावे हे त्याला कळेना.
आई बाबा गेल्यानंतर अनघा एकटी अंधार बसली होती. खुप साऱ्या प्रश्नांचं वादळ तिचा डोक्यात घोंगावात होते. अमेय तिला पाहून क्षणभर थबकला. अनघा मक्खपणे बसून होती. तिला काय झालंय याचा अंदाज त्याला येईना. त्याने तिच्या आईला कॉल केला.
सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले पण अमेयचा चढता आवाज ऐकून त्या वरमल्या. त्यांनी घडलेल्या घटनेचा पाढा जेव्हा त्याच्यापुढे वाचला तेव्हा त्याचा राग अनावर झाला.
Marathi Horror Stories
"तिचा आयुष्यातली इतकी मोट्ठी गोष्ट तुम्ही तिच्यापासून लपवून ठेवलीत...? तुम्ही कधी विचार केलात का, कि जेव्हा तिला हि गोष्ट समजेल, तेव्हा तिच्यावर काय परिणाम होईल? हे सत्य ज्याचापासून ती पूर्ण अनभिज्ञ असेल त्याचा भार ती कशी सांभाळेल? आतापर्यंत तुम्ही खुपच चांगल्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या, आता अनघा माझी जबाबदारी आहे. इथून पुढे मी आणि अनघा बघून घेतो." अमेय रागाने थरथरत होता. लक्ष्मीबाईंच काहीएक ऐकून न घेता त्यानं फोन ठेऊन दिला.
क्षणभर त्यानं अनघाकडे एक कटाक्ष टाकला. तिला अशा अवस्थेत बघून त्याला गहिवरून आले. त्याने तिला घट्ट मिठी मारली. आणि त्यात ती विरघळली. इतक्या वेळ धरून ठेवलेला अश्रूंचा बांध तिने फोडला आणि त्याला बिलगून तिने अश्रूंना वाट करून दिली.
"अमेय... मला या गोष्टीची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती रे! असं वाटतंय नशिबाने माझी क्रूर चेष्टा केली आहे." ती पोटतिडिकीने बडबडली.
"श... इकडे ये माझाजवळ..! आणि पाहिलं शांत हो. जे झालं ते झालं. तुझ्यासोबत काय झाला कसं झाला हे आपण बदलू शकत नाही. पण यातून आपल्याला बाहेर पडायचा आहे. आणि आता तू एकटी नाहीयेस. मी तुझ्यासोबत आहे. जोपर्यंत माझा श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुझ्या केसाला धक्काही लागू देणार नाही." इति अमेय.
अनघा त्याला बिलगली आणि त्याचा बाहुपाशात हरवून गेली.
रडून रडून झोपी गेलेली अनघा नुकतीच झोपी गेली होती. दिवसभर ऑफिसमद्धे दमून भागून आलेला अमेय अनघाला सांभाळता सांभाळता स्वतः ही थोडा हादरला होता. त्यानं तिचा केसांवरून हात फिरवला. अनघाचा कपाळाचे चुंबन घेतलं, आणि तिचा अंगावर शाल पांघरली.
एक दीर्घ उसासा सोडून अमेय उठला. रात्रीचे एक वाजले होते. तो किचनमध्ये गेला आणि फ्रिजमद्धे दूध शोधू लागला. मस्त चहा बनवून त्याने तो कपामद्धे भरला.
बाल्कनीमद्धे उभा राहून अमेय चहाचे घोट घेऊ लागला. मंद वारा आणि 'कडक चहा' यामुळे त्याला थोडी तरतरी आली. त्याचा बुद्धीला थोडी चालना मिळली आणि त्याचा विचाराचे घोडे चौफेर दौडू लागले.
Marathi Horror Stories
Marathi horror stories read online
Horror stories in Marathi for reading
तो त्याचा बेडरूम मद्धे आला. अनघा शांत झोपली होती. त्याला लक्ष्मीबाईंनी सांगितलेल्या डॉक्टर जोशींबद्दल आठवले. त्यांना भेटायला हवं हा विचार त्याचा डोक्यात चमकला. लॅपटॉप खोलून तो त्यांच्याबद्दल सर्च करू लागला. त्यांचा पत्ता आणि फोन नंबर त्याने डायरीमद्धे नमूद केला.
बाल्कनीजवळ असलेल्या झाडावर बसलेले ते काळे धूड डोळ्यात अंगारे घेऊन त्याचा हालचाली बारकाईने टिपत होते. त्याच ते खुनशी हसू आणि जळजळीत कटाक्ष अमेयवर अदृश्य वार करत होते.
या अतृप्त चाहुलीपासून अनभिज्ञ असलेला अमेय लॅपटॉप बंद करून पुन्हा बाल्कनीमद्धे गेला. त्याच्या झोपेने पोबारा केला होता त्यामुळे तो इकडेतिकडे येरझाऱ्या घालत होता.
अचानक त्याची नजर त्या लालसर डोळ्यांवर खिळली. आणि तो टक लावून तिकडे बघू लागला. ते धूड हि खुनशी हास्य करत झाडामद्धे धुमाकूळ घालतं होतं. मग मात्र अमेय घाबरला. त्याने बाल्कनीचे दार बंद केले आणि तो बिछान्यावर झोपायचा प्रयत्न करू लागला.
Marathi Horror Stories
Marathi horror stories read online
Horror stories in Marathi for reading
"काय असेल ते...? जणू काही कुणाचे विखारी डोळे माझ्यावर वार करत होते कि काय, अस मला वाटलं... कि भास असेल...? श्य्य्या... काही समजतचं नाहीये... अनघाला उठवू का? नको...!"अमेय मनातल्या मनात विचार करू लागला. "भासचं असेल माझा. भूतबीत काही नसतं. आणि जरी असलं तरी कुठं माझा ओळखीचं असणार आहे!"
डोक्यातले विचार झटकून तो झोपायचा प्रयत्न करू लागला. कुणीतरी म्हटलंय नं, मनाला मनाने मनोमन मनवल की मनही मनाचा मानतं. मनाचे खेळ...दुसरं काय..!
* * *
रात्रीचे तीन वाजले होते. रात्रीची किर्रर्र निरव शांतता होती. एक अनामिक शक्ती सावज टिपणार होती. तो आला होता... परत एकदा अनघाचा आयुष्यात थैमान घालायला.
अमेय जरी झोपायचा प्रयत्न करत होता, तरी त्याचे कान आसपासचा आवाजांचा कानोसा घेत होते. अचानक त्याचा कानाशेजारी गुरगुरण्याचा आवाज आला. त्याच्या काळजाचा थरकाप उठला. आधी ते लालचुटुक डोळे आणि आता हा आवाज!!! घाबरून त्याने अजून घट्टपणे डोळे मिटून घेतले.
तो आवाज आणि त्या धुडाचा गरम श्वास अमेयला जाणीव करून देत होता कि ही अमानवी शक्ती त्याचा अगदी जवळ आहे.
"अनघा..." तिचा विचार आला आणि त्यांनी पटकन डोळे उघडले. आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या जीवाचा थरकाप उडाला. त्याच्या आणि अनघाच्या मद्धे एक काळी भयानक आकृती होती.
काळाकभिन्न चेहरा, लालसर डोळे, दात विचकट विकृतपणे ती काळी सावली अमेयवर जळजळीत कटाक्ष टाकत होती. त्याचे मोठमोठी नख असलेली हात अनघाकडे सरसावत होती. निपचित पडलेल्या अनघाला वाचवायचं कसं हे अमेयला समजेना. त्याचा चेहऱ्यावर भीतीची छटा उमटली होती. त्याला जाणवलं कि त्याचा शरीर थंड पडलं आहे.
"हे स्वप्न आहे कि सत्य आहे...? मी काहीच कसं करू शकत नाहीये. हे महादेवा, आम्हाला वाचावंआणि जर हे स्वप्न असेल तर लवकर संपू देतं." अमेय मनोमन महादेवाला आरवू लागला.
त्या आकृतीने आपले विभित्सक रूप दाखवायला सुरुवात केली. त्याने अनघाचा शरीरावर हात फिरवायला सुरुवात करताच अमेय जोरात किंचाळला, "अनघा...!"
त्या आकृतीने अमेयवर झडप घातली आणि आपला मोर्चा त्याच्याकडे वळवला. त्याची मगरमिठी अमेय ला जाणवू लागली. तो भीतीने पांढराफटक पडला.
"खिदीखिखिखीखीखीखीकः..." ती किळसवाणी, ओंगळवाणी, आकृती गुरगुरणाऱ्या आवाजात बोलायला लागली, "जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत अनघाचा केसालाही धक्का लागू देणार नाही असं बोलतोय होय... थांब पहिला तुझ्या नरडीचा घोट घेतो.
Marathi Horror Stories
Marathi horror stories read online
Horror stories in Marathi for reading
आपली अणकुचीदार नखं तो अमेयच्या गळ्यामध्ये रुतवु लागला. रक्ताची चिळकांडी त्या आकृतीच्या चेहऱ्यावर उडाली. अधाशाप्रमाणे तो अजून पुढे सरसावला आणि आपली किळसवाण्या जिभेने ते रक्त तो चाटू लागला.
अमेय किलकिल्या डोळ्याने अनघाकडे बघायला लागला. ती निर्जीवपणे निपचित पडली होती. अनघासोबत दररोज रात्री काय प्रकार घडतो याचा अंदाज आता अमेयला आला होता.
Marathi horror stories blogs
सकाळी कोमेजलेली अबोल अनघा या नराधमामुळे अशी वागत आहे हे त्याला कळलं. त्याने पुन्हा एकदा डोळे बंद केले. आपली सारी शक्ती त्याने एकत्र केली आणि महादेवाचा धावा सुरु केला. "ओम नमः शिवाय... ओम नमः शिवाय... ओम... नमः... शिवाय..." अमेयच्या जपनामामुळे त्याचं ते तेज त्या आकृतीला सहन होईना.
पहाटेचे चार वाजत आले होते. त्यांचा अपार्टमेंटच्या खाली असणाऱ्या मंदिरामद्धे लेले काकांनी पहाटेच्या काकडआरतीला सुरुवात केली होती. दररोज मंद वाटणारा घंटानाद आज तेजस्वी वाटत होता. त्यानं अमेयला अजून चेव सुटला आणि त्यानं जोरात 'ओम नमः शिवायचा' जयघोष सुरु केला.
चित्कारत ती आकृती बाल्कनीच्या बाहेर गायब झाली. महादेवाच्या कृपेने तिची डाळ काही शिजली नाही. अमेयने गळ्याला अनघाची ओढणी गुंडाळली आणि जोरात जाऊन अनघाला गदागदा हलवू लागला.
* * *
"काय सांगतोस काय अमेय. हि जखम आणि ती विचित्र आकृती...? हे खुपच भयानक आहे." सगळा वृत्तांत ऐकून तिने स्वतःच डोकं गच्च पकडलं.
अमेयचा गळ्यावरील नखांचे व्रण त्या भयानक रात्रीचे साक्षीदार होते.
अमेय शून्यात नजर खिळवून बसला होता. ती भयाण रात्र, एकामागोमाग एक धक्के, अमानवी शक्ती, तिचा हल्ला, त्यातून त्याचं बचावणं, हे सगळं त्याला पचवणं जड जातं होतं. आधी dissociative amnesia आणि आता हि अनामिक शक्ती म्हणजे तिच्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले होते.
Marathi horror stories blogs
ब्रम्ह्यमुहूर्तानंतर सूर्यनारायणाचे आगमन झाले होते. सूर्याच्या नव्या किरणांसोबत तिचा मनात आशेचा किरण देखील डोकावला. आणि निर्धाराने ती अमेयचा डोळ्यात डोळे घालून बोलली, "आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेतं. या घटनेची सुरुवात माझ्या आजोळी झाली त्यामुळे त्याचा शेवट पण तिथेच होणारं. माझा आठवणींची अक्षर धूसर झाली आहेत. त्यामुळें मलाच लेखणी घेऊन ती अक्षर ठळक करायची आहेत."
"मला असं वाटतंय त्यातूनचं आपल्याला या अमानवी शक्तीचा सुगावा लागेल. कारण बरेचदा भविष्यकाळचं हा भूतकाळाचा आरसा असतो."
लक्ख प्रकाशाने घर उजळून निघाले होतं. कोण जाणे अनघाच्या आठवणी देखील त्यामुळे प्रखर होतील!
ConversionConversion EmoticonEmoticon