आठवण भाग: १ | Best Marathi Horror Stories Read Online

आठवण भाग: १

रक्त गोठवणारी ती काळरात्र होती. तिचा विचाराने देखील अनघाचा अंगावर शहारा उठला. तिची ती भेदरलेली नजर पाहून अमेय चकित झाला. गेल्या आठवड्यापासून अनघाचा स्वभावातला बदल त्याला चक्रावून सोडत होता. सतत विचारमग्न राहणाऱ्या अनघाचा अबोला त्याला भेडसावत होता.


marathi-horror-stories


Marathi horror stories

अगणित प्रश्नाचा  ढिगारा दूर सारून त्याने तिला जोरात हाक मारली. “अनघा……काय झालं आहे तुला ?”

अमेयचा हाकेने ती भानावर आली. स्वतःला सावरत तिनं ती गोष्ट नेहमीप्रमाणे टाळली. त्याची नजर अतिशय शिताफीने चुकवून तिने हळूच कॉफीचा मग ओठाला लावला...आणि पुन्हा विचारात हरवून गेली.

अनघा आणि अमेय…! नुकतच नवीन लग्न झालेलं जोडपं. अनघाला फोटोग्राफी ची विशेष आवड होती. याच आवडीला तिने आपल व्यवसाय ही बनवला होता. वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करून तिथले फोटो काढणे तिला फार आवडायचे. लोकांसाठी तो फक्त एक फोटो असायचा, पण तिच्यासाठी तो एक प्रवास असायचा...नवनवीन कहाणीचा…! तीच हेच प्रोफेशन तिचा आणि अमेय चां भेटीतच  कारण बनलं आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला अमेय सोबत तिचे सुर जुळले.

Marathi horror stories
Horror stories in Marathi for reading
Marathi horror stories blogs

लग्नानंतर दोघेही एकमेकांचा आधाराने आपल्या दैनंदिन जीवनात रुळू लागले. त्यातच अनघाला एक प्रोजेक्ट अंतर्गत कोकणातील एका गावाकडे जायची संधी मिळाली. अनघाचा नाईलाज होता, कारण ती ज्या कंपनी साठी काम करत होती त्यांचा कॉन्ट्रॅक्टनुसार तिला नकार देणे अशक्य होते.

ग्रामीण भागातील जीवन फोटोग्राफीचा रुपात मांडण्याचा हेतू घेऊन अनघा प्रवासाला निघाली होती. त्यात ती तिचा आजोळी च जाणार असल्याने ती थोडीफार खुश होती. खूप वर्षानंतर ती आपल्या आजोळी निघाली होती आणि या वेळी तिच्याकडे कारण भक्कम असल्याने आई बाबा हि नकार देऊ शकले नाही. अमेय ही जाम खुश होता.दोघेही तयारी करून प्रवासाला सज्ज झाले.

“बाळा, गावी पोहचली की पहिला ग्रामदेवतेच्या दर्शनास जा आणि रात्री फिरू नका, एकमेकांची काळजी घ्या आणि काम पटकन आवरून घरी या.“ आई काळजीपोटी बोलली.

”हो गा आई आणि बाकी गावी मामा-मामी आहेतच ना!!! मग टेन्शन नको ग  घेऊस.” सगळ्यांचा निरोप घेऊन अमेय आणि अनघा गावी रवाना झाले.

“तिला या गोष्टीची कल्पना आधी देऊन ठेवायला हवी होतीस तू लक्ष्मी..!” सुधाकर राव काळजीने अनघाच्या आई लां बोलले.

”अहो…,मी कुठल्या तोंडाने तिला सांगणार? जे कटू सत्य मी इतके वर्ष हृदयात लपवून ठेवले आहे ते तिचा समोर कधी येऊ नये याची काळजी घेतली ते आता इतक्या वर्षांनंतर बाहेर पडू नये हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.”

Marathi horror stories
Horror stories in Marathi for reading
Marathi horror stories blogs

‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना...’ रेडिओवर मस्त गाण्याचे बोल अनघाचा मूड फ्रेश करत होते. ढगाळ वातावरण असल्याने तीला दिवसभर प्रवासाचा आनंद लुटता आला. पण सुखाला गालबोट लावायला एक अनामिक शक्ती तिची वाट बघत उभी आहे याची तिला कल्पना नव्हती.

कडाक्याचा उन्हाळ्याने हैराण झालेल्या लोकांवर नुकतच इंद्रदेव प्रसन्न झाल्याने वर्षारुतूचे आगमन झाले होते. हवेत हलकासा गारवा होता. आणि त्यात कोकण म्हणजे विचारूच नका!

प्रवासाचा दरम्यान अनघा अमेयचा गप्पा चांगल्या रमल्या होत्या. लहानपणीचया खुप साऱ्या आठवणी आणि त्या सांगताना अनघाचा गोजिरवाणा चेहरा बघून अमेय तिचा प्रेमात अखंड बुडत चालला होता.

बोलता बोलता अनघाने अमेयला तिचा बालपणीचा किस्सा सांगितला. "लहानपणी ना मी, आई, बाबा उन्हाळ्याचा सुट्टीत गावी येत असू. गावी आज्जी-बाबा आणि मामा असायचे. रात्रीचा जेवण झाला कि आम्ही अंगणात बाबांजवळ बसून आम्ही गप्पा   मारायचो. मग बाबा आम्हाला खुप साऱ्या गोष्टी सांगायचे. राजाराणीचा, जादूचा, भुताचा..!  त्या गोष्टींमद्धे अगदी रमायला होयचा.'' बोलता बोलता ती त्या आठवणीमद्धे हरवून गेली.

''आणि मग ...?'' अमेयने तिला विचारले, तशी ती भानावर आली.

''आणि मग..." त्यांनंतरच्या खुप साऱ्या आठवणी तिला धूसर आठवू लागल्या. तिने खुप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला खुप गोष्टी काही केल्या आठवेना.

''अग सांग ना...अशी अचानक गप्प का बसलीस ..?

''अरे काही नाही असच हरवले रे आठवणी मद्धे..." अनघा उत्तरली.

मावळत्या सूर्याची किरणे वातावरण बदलत होते. येणाऱ्या संकटाची चाहूल नसलेली अनघा आपल्याच धुंदीत गाडी चालवत होती. घाटामध्ये प्रवेश केल्यानंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. ही तर फक्त सुरुवात होती. ही रात्र तिचा आयुष्यातली काळरात्र ठरणार हे मात्र नक्की होतं.

"काय  फालतुगिरी आहे हि ..? अनघा, आपण इथे राहणार आहोत का...? ह्या खुराड्यात राहणार आहोत का आपण...? ते पण एक महिन्यासाठी? काही दुसरी सोय होणार नाही का आपली?'' त्रासलेला अमेय अनघा कडे रागाने बघू लागला.

"थांब मी मामाला कॉल करून विचारते. अरे यार...मामा पण अचानक पुण्याला गेला आहे त्यामुळे आपली गैरसोय होत आहे. हा जुना वाडा आहे. माळी काकांनी मला याची किल्ली दिली आहे. फक्त आजची रात्र आपण इथे राहूयात. उद्या सकाळी अशोकमामा आला कि आपण नवीन वाड्यात जाऊयात. मी माळी काकांना सांगून  साफसफाई करून घेते. तू शांत हो!''

Marathi horror stories
Horror stories in Marathi for reading
Marathi horror stories blogs

दमून भागून अनघा बेड वर आडवी झाली. दिवसभर प्रवासाने दमलेला अमेय कधीच निद्रादेवीच्या अधीन झाला होता. दिवसभर घडलेल्या घटनांचा ती विचार करू लागली. ज्या वाड्यात तिचा बालपण गेला आज अनेक वर्षांनंतर ती तिथे आली होती. काही केल्या तिला झोप लागेना.

अचानक दरवाजा किर्रकिर्रण्याचा आवाज आला. अनघा दरवाजा बंद कारण्यासाठी उठली. बेडरूम मधून बाहेर येऊन ती इकडेतिकडे बघू लागली कि आवाज नेमका कुठून येत आहे.

तिने हॉल मद्धे प्रवेश केला. अचानक हवेमद्धे गारवा वाढला. अनघा थंडीने कुडकुडू लागली. दरवाज्याचा किर्रकिर्रण्याचा आवाज वाढू लागला तर तिला कळले कि हॉल चा दरवाजा उघडा आहे.

तिने पुढे सरसावून दरवाजा बंद केला. मागे वळून जेव्हा तिने पहिले तेव्हा तिच्या  पायाखालची जमीन सरकली. क्षणभरासाठी तिला वाटले कि तिचा श्वास बंद पडतो कि काय...

पण समोरचा दृश्य पाहून आत्तापर्यंत धूसर वाटणाऱ्या आठवणी तिला स्पष्ट आठवू लागल्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाली. "तू...?"

गुरगुरत्या स्वरात कुत्स्तितपणे तो उत्तरला. ''हो.....मीच!!!! तू विसरली असशील मला पण मी कसा विसरेल ग तुला.......?"


Read All Episodes: 

Episode 1

Episode 2

Oldest

3 टिप्पणी(ण्या)

Click here for टिप्पणी(ण्या)
Unknown
admin
२५ मार्च, २०२२ रोजी १०:०३ PM ×

उत्सुकता वाढवणारं आहे...पुढील episode वाचण्यासाठी उत्सुक!!!

Reply
avatar
Unknown
admin
२६ मार्च, २०२२ रोजी ६:५८ PM ×

Cliffhanger! 👀 पुढचा भाग कधी येणारे?

Reply
avatar